पुंछ :
जम्मू-काश्मीर पोलिसांनी पुंछ जिल्ह्यातील हरि बुड्ढा भागातून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी एका शाळेचा मुख्याध्यापक असून त्याच्याकडून विदेशात निर्मित पिस्तुल आणि चिनी ग्रेनेड हस्तगत करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान हल्ला करण्यासाठी या शस्त्रास्त्रांचा वापर केला जाणार होता असा संशय आहे. आरोपीचे नाव कमरुद्दीन असून त्याची कसून चौकशी केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.









