वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला एकामागून एक झटके बसत आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे हिमाचल प्रदेश प्रभारी सचिव आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय तेजिंदरसिंग बिट्टू यांनी शनिवारी पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांमध्येच भाजप पक्षात प्रवेश केला. भाजप सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगिलही उपस्थित होते. बिट्टू यांच्या भाजप प्रवेशामुळे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे बळ वाढण्यास मदत होणार आहे.









