सेन्सेक्स 455 तर निफ्टी 152 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात गुरुवारी सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकांत घसरणीचा कल राहिल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील घडामोडींच्या दरम्यान मिळताजुळता कल राहिला होता. परंतु आयटी क्षेत्रात तेजी तर बँकिंग समभागात मोठी घसरण राहिल्याचा परिणाम हा बाजारात झाला आहे. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 454.69 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.62 टक्क्यांसोबत 72,488.99 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 152.05 अंकांनी घसरुन निर्देशांक 21.995.85 वर बंद झाला. मागील आठवड्यातील शुक्रवारच्या सत्रात सुरु झालेला घसरणीचा प्रवास हा नवीन आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवशीही कायम राहिला आहे. बुधवारी रामनवमी राहिल्याने बाजाराला सुट्टी होती.
एचडीएफसी लाईफने मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीतील नफा कमाईची आकडेवारी सादर केली आहे. कर परतावा केल्यानंतर वर्षाच्या आधारे झालेला नफा हा 14 टक्क्यांनी वधारुन 412 कोटी रुपयावर पोहोचला आहे. गुरुवार शेअर बाजारात तेजी राहिली होती. मात्र अंतिम क्षणी मात्र सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. वधारलेल्या कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज ऑटो, हिंडाल्को, एलअॅण्डटी माइंडट्री, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि इन्फोसिस यांच्या समभागांचा समावेश राहिला आहे. अन्य कंपन्यांमध्ये अपोलो हॉस्पिटल, टायटन, ओएनजीसी, नेस्ले इंडिया, अदानी एंटरप्राईजेस, कोल इंडिया आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग हे प्रभावीत राहिले.
52 आठवड्यातील अव्वल समभाग
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी चढउताराचा कल राहिला होता. तर मागील 52 आठवड्यांच्या प्रवासात जस्ट डायल, एबीबी पॉवर, 360 वन वॅम, क्वेस कॉर्प, मॅनकाइंड फार्मा, जिओ फायनान्स आणि केएसईबी यांचे समभाग अव्वल राहिले आहेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- भारती एअरटेल 1267
- पॉवरग्रिड कॉर्प 280
- इन्फोसिस 1420
- लार्सन अॅड टुब्रो 3555
- बजाज ऑटो 9062
- हिंडाल्को 616
- सिमेन्स 5584
- हॅवेल्स इंडिया 1494
- मॅरिको 508
- डाबर इंडिया 504
समभाग घसरलेल्या कंपन्या
- नेस्ले 2462
- टायटन 3526
- अॅक्सिस बँक 1024
- एनटीपीसी 351
- टाटा मोर्ट्स 371
- आयटीसी 418
- टेक महिंद्रा 1179
- बजाज फिनसर्व्ह 1597
- आयसीआयसीआय 1055
- एचडीएफसी बँक 1494
- विप्रो 444
- स्टेट बँक 744
- अल्ट्राटेक सिमेंट 9387
- सनफार्मा 1523
- बजाज फायनान्स 6889
- मारुती सुझुकी 12403
- एशियन पेन्ट्स 2811
- इंडसइंड बँक 1481
- कोटक महिंद्रा 1786
- एचसीएल टेक 1470
- हिंदुस्थान युनि 2214
- टीसीएस 3863
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2928
- जेएसडब्लू स्टील 844
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 2029
- टाटा स्टील 160
- अशोक लेलँड 169
- मॅक्सहेल्थकेअर 789
- कोल इंडिया 438
- सिप्ला 1352
- डिव्हीस लॅब 3717









