वृत्तसंस्था/ लंडन
2026 साली होणाऱ्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेच्या यजमानाची घोषणा मे महिन्यात केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रकूल क्रीडा फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली. ही स्पर्धा भरविण्याच्या यजमानपद शर्यतीमध्ये व्हिक्टोरियाचा समावेश होता. पण गेल्या जुलैमध्ये व्हिक्टोरियाने यजमानपद शर्यतीतून माघार घेतली आहे.
2018 ची राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्टने भरविली होती. 1930 साली पहिल्यांदा राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा भरविण्यात आली होती. ब्रिटनने या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले होते आणि त्यानंतर ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, भारत, जमैका, मलेशिया, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि वेल्स येथे घेण्यात आली होती. आर्थिक समस्येमुळे व्हिक्टोरियाने 2026 च्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा यजमानपद शर्यतीतून माघार घेतल्याचे सांगण्यात आले.









