निर्मात्याकडून दिग्दर्शकाचे नाव जाहीर
बॉलिवूडचा दिग्गज निर्माता करण जौहरने 12 वर्षांपूर्वी ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपट निर्माण केला होता. या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर करणने ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ची निर्मिती केली होती. परंतु आता तो चित्रपट नव्हे तर यावर वेबसीरिज तयार करणार असून याचे दिग्दर्शन रीमा माया करणार आहे. स्टुडंट ऑफ द ईयर 3 ला वेबसीरिजच्या स्वरुपात प्रदर्शित करण्याचा विचार असल्याचे त्याने सांगितले आहे. रीमा यांना ‘नॉक्टर्नल बर्गर’साठी ओळखले जाते.
स्टुडंट ऑफ द ईयर 3 साठी रीमाच निर्णय घेणार आहे. रीमा या पुरस्कार विजेत्या लेखिका-दिग्दर्शिका आणि कॅटनीप प्रॉडक्शन हाउसच्या सह-संस्थापिका आहेत. त्यांच्या लघूपटांना अनेक चित्रपटांना गौरविण्यात आले आहे. रीमा यांच्या ’नॉक्टर्नल बर्गर’ या लघूपटाचा प्रीमियर सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला होता. तसेच त्यांनी नेटफ्लिक्स, रेड बुल आणि बोट यासारख्या मोठ्या ब्रँड्ससाठी व्हिडिओ देखील दिग्दर्शित केले आहेत.









