चार इच्छुकांचे अर्ज म. ए. समितीकडे सुपूर्द
बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी म. ए. समितीकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. शनिवार दि. 6 रोजी शेवटचा दिवस होता. त्या दिवशी दोन अर्ज दाखल झाले आहेत. एकूण चार इच्छुकांनी म. ए. समितीकडे आतापर्यंत अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी म. ए. समितीकडे चव्हाट गल्ली येथील आनंद आप्टेकर, गांधीनगर येथील चंद्रकांत कोंडुस्कर यांनी अर्ज दाखल केले. मदन बामणे, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम यांनी हे अर्ज स्वीकारले आहेत. एकूण चार अर्ज दाखल झाले आहेत. आता निवड कमिटी यामधील एका उमेदवाराची निवड करून त्याचे नाव जाहीर करणार आहेत. म. ए. समितीच्या या इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह आपले अर्ज दाखल केले आहेत. यावेळी म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.









