अरविंद केजरीवालांचा ‘आप’ आमदारांना सल्ला
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या आमदारांनी आणि इतर लोकप्रतिनिधींनी नेहमी आपल्या मतदारसंघांना भेट द्यावी आणि लोकांशी संपर्क करावा, असा सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. त्यांनी दिल्लीच्या तिहार कारागृहातून पाठविलेल्या संदेश पत्राचे वाचन त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी केले. मी जरी दिल्लीच्या करागृहात असलो तरी, साऱ्या दिल्लीची जनता माझ्या परिवाराचा भाग आहे. माझ्या या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होत कामा नये. आमदार आणि लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेतला पाहिजे, असेही केजरीवाल यांनी त्यांच्या संदेशात स्पष्ट केले आहे.









