अनुसूचित जाती-जमाती, दलित नेत्यांच्या बैठकीला केले संबोधित
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयामध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि दलित नेत्यांची बैठक घेण्यात आली. महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीत बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर, दलित नेते मल्लेश चौगुले, मल्लेश कुरंगी, सिद्राय मेत्री, महेश कोलकार, निंगाप्पा तळवार, हिरालाल चव्हाण, सुरेश गवण्णावर आदी नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









