नवी दिल्ली :
बांधकाम क्षेत्रातील कंपनी कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनल यांना नुकतीच एक 2071 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे. सदरची ऑर्डर विदेशातून प्राप्त झाली असल्याची माहिती आहे. यासोबतच मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी रचना आणि बांधकामाचे कंत्राटदेखील कंपनीला प्राप्त झाले आहे. विदेशात रेल्वे प्रकल्पातील बोगद्याचे काम ब्राझीलमध्ये कंपनीला हाती घ्यायचे आहे. गेल्या आर्थिक वर्षांमध्ये पाहता कल्पतरु प्रोजेक्ट इंटरनॅशनल यांना जवळपास एकंदर 30000 कोटी रुपयांचे आतापर्यंत कामाचे कंत्राट प्राप्त झाले आहे.









