35 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी : नव्या युतीमुळे वाढणार अखिलेशच्या अडचणी
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीवरून राजकारण सातत्याने तापत आहे. 2022 मध्ये समाजवादी पक्षासोबत युती करणाऱ्या ‘अपना दल-के’ने आता वेगळा राजकीय प्रवाह तयार केला आहे. ‘अपना दल-के’च्या नेत्या पल्लवी पटेल यांनी नुकताच सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. त्या स्वत:ला मागासलेल्या दलित अल्पसंख्याकांचा म्हणजेच पीडीएच्या राजकारणाचा सर्वात मोठा चेहरा म्हणवत आहेत. आता ती या प्रकरणाबाबत असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत लोकसभा निवडणूक लढवण्याची रणनीती तयार केली आहे. रविवारी पल्लवी पटेल आणि असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये नव्या युतीची औपचारिक घोषणा केली. यासह पल्लवी पटेल मागासवर्गीय आणि असदुद्दीन ओवैसी दलित व्होट बँक एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. याचा मोठा परिणाम विरोधी आघाडीच्या व्होट बँकेवर होऊ शकतो.
अखिलेश यादव यांनी अपना दलाच्या नेत्या आणि सपा आमदार पल्लवी पटेल यांना नुकताच मोठा धक्का दिला आहे. पल्लवी पटेलच्या प्रश्नाला उत्तर देताना यूपी निवडणुकीत 2022 मध्ये युती झाली होती. आता 2024 मध्ये नाही. यानंतर पल्लवी पटेल यांनी विरोधी आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसकडून स्पष्टीकरण मागितले. परंतु, त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. यानंतर पल्लवीनेही विरोधी आघाडीपासून अंतर वाढवण्याचे संकेत दिले. आता पल्लवी पटेल 2024 ची लोकसभा निवडणूक वेगळ्या आघाडीसोबत लढणार आहे. ‘अपना दल-के’ने भागिदारी संकल्प मोर्चाच्या नावाने पाच पक्षांसोबत युतीची तयारी केली आहे. आपली आघाडी प्रत्यक्षात मागासलेल्या दलित अल्पसंख्याकांचे म्हणजेच पीडीएचे हक्क वाचवण्यासाठी लढणार असल्याचा दावा पल्लवी पटेल यांनी केला आहे.
‘अपना दल-के’ 35 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या जागांवर उभे असलेले उमेदवार ‘पीडीए’च्या कक्षेत ठेवून त्यांची युती आपला पाठिंबा जाहीर करू शकते. भागिदारी संकल्प मोर्चा अंतर्गत पल्लवी पटेल फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्मयता आहे. त्याचवेळी, कृष्णा पटेल आपली मोठी मुलगी आणि मिर्झापूर येथील अपना दल एस प्रमुख अनुप्रिया पटेल यांना स्पर्धा देताना दिसत आहेत.









