हा नियम 1 एप्रिलपासून होणार लागू : यामुळे अनधिकृत प्रवेशाचा धोका कमी होणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आता एनपीएसमध्ये लॉगिन करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आवश्यक असेल. नॅशनल पेन्शन सिस्टमची सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी (सीआरए)च्या नवीन नियमानुसार, सर्व वापरकर्त्यांना पासवर्ड व्यतिरिक्त आधार ओटीपीद्वारे लॉग इन करावे लागेल. सध्या, केंद्र आणि राज्य सरकारचे नोडल अधिकारी आणि त्यांच्या स्वायत्त संस्था केवळ पासवर्डद्वारे लॉग इन करून सर्व रेकॉर्डमध्ये प्रवेश करू शकतात. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने हा बदल जाहीर केला आहे. हा नवा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. या नव्या सुविधेमुळे अनधिकृत प्रवेशाचा धोका कमी होणार असून द्वि-घटक प्रमाणीकरण अनधिकृत प्रवेशाचा धोका कमी करेल. यासह, केवळ सीआरए प्रणालीचे सत्यापित वापरकर्ते लॉग इन करण्यास सक्षम असतील.
पैसे काढण्याच्या नियमांमध्येही बदल
या अगोदर 1 फेब्रुवारीपासून पीएफआरडीएने पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, एनपीएस खातेधारकांना एकूण जमा केलेल्या रकमेच्या 25 टक्केपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नाही. यामध्ये खातेदार आणि नियोक्ता (कंपनी) दोघांच्याही योगदान रकमेचा समावेश असेल. यानुसार, तुमच्या नावावर आधीपासून घर असल्यास, एनपीएस खात्यातून पैसे काढण्याची परवानगी नसेल.
नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे काय?
नॅशनल पेन्शन सिस्टम ही सरकारची पेन्शन-कम-गुंतवणूक योजना आहे. ज्याद्वारे तुम्ही निवृत्तीसाठी बचत करू शकता. एनपीएसमध्ये जमा केलेल्या रकमेच्या 40 टक्के रक्कम जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित 60 टक्के रक्कम तुम्ही एकरकमी निवृत्तीदरम्यान काढू शकता.









