वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स (फ्लोरिडा)
सर्बियाचा टॉप सिडेड पुरूष टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने चालू आठवड्याच्या उत्तरार्धात सुरू होणाऱ्या एटीपी टूरवरील मियामी खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. व्यवसायिक स्पर्धा कार्यक्रम आणि घरगुती समस्या यांच्यात ताळमेळ नसल्याने आपल्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याचे जोकोविचने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
सध्या सुरू असलेल्या एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील इंडियन वेल्स बीएनपी पेरीबस पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत गेल्या सोमवारी तिसऱ्या फेरीतील सामन्यात नवोदित नेर्डीकडून जोकोविचला पराभव पत्करावा लागला होता. 36 वर्षीय जोकोविचने मियामी स्पर्धा आतापर्यंत सहा वेळेला जिंकली आहे.









