वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरूषांच्या 10 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळविणाऱ्या 25 वर्षीय भारताचा धावपटू गुलवीर सिंगने नवा राष्ट्रीय विक्रम केला.
25 वर्षीय गुलवीर सिंगने पुरूषांच्या 10 हजार मी. धावण्याच्या स्पर्धेत 27 मिनिटे 41.81 सेकंदाचा अवधी घेत नवा राष्ट्रीय विक्रम करताना यापूर्वी म्हणजे 2006 साली सुरेंद्र सिंगने या क्रीडा प्रकारात नोंदविलेला 28 मिनिटे 02.89 सेकंदाचा 16 वर्षे अबाधित राहिलेला राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. मात्र पॅरिस ऑलिम्पिकसाठी गुलवीर सिंगला पात्रतेची मर्यादा गाठता आली नाही. कार्तिककुमारने या क्रीडा प्रकारात नववे स्थान मिळविले. महिलांच्या विभागात पारुल चौधरीला 20 वे स्थान मिळाल्याने तिला पॅरिस पात्रता मर्यादा गाठता आली नाही.









