भाजपकडून पशुपती पारस यांना राज्यसभेची ऑफर ठरणार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारमध्ये चिराग पासवान यांची भाजपशी सुरू असलेली चर्चा स्पष्ट झाली आहे. चिराग पासवान यांना हाजीपूरसह पाच जागा मिळू शकतात. तर त्यांचे काका आणि केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांना एकही जागा मिळणार नसल्याचे समजते. लोकसभेच्या जागेऐवजी राजकुमार राज याला बिहार मंत्रिमंडळात मंत्री केले जाऊ शकते. राजकुमार राज हे समस्तीपूर मतदारसंघातून लोकसभा खासदार आहेत. तसेच पशुपती पारस यांना राज्यसभेवर पाठवण्याची ऑफर दिली आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी चिराग पासवान आणि पशुपती कुमार पारस यांच्यावर भाजप हा राष्ट्रवादावर आधारित पक्ष असल्याचे सांगितले. त्यामुळे काका-पुतण्यांना भाजपसोबत राहायचे आहे. दोघेही भाजपकडेच राहतील. भाजप हा कोणत्याही एका वर्गाचा नसून सर्व वर्गाचा पक्ष असल्याचे ते म्हणाले.
चिराग पासवान यांनी बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासोबत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी न•ा यांची भेट घेतल्यानंतर पासवान यांनी ही घोषणा केली. ‘भाजपने माझ्या सर्व चिंता दूर केल्या आहेत. मी समाधानी आहे,’ असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांमधील जागांच्या समन्वयावर निर्णय घेण्यात आला असून लवकरच त्याची औपचारिक घोषणा केली जाईल. चिराग पासवान यांना त्यांचे काका पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील एलजेपी गटाच्या भवितव्याबद्दल विचारले असता त्यांनी सविस्तर बोलणे टाळले.









