वृत्तसंस्था/ काबूल
अफगाण क्रिकेट संघातील 35 वर्षीय फलंदाज नूर अली झद्रनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. नूर अली झद्रनने आपल्या तब्बल 10 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
2009 साली स्कॉटलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात नूर अली झद्रनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पदार्पण करताना 28 चेंडूत 45 धावा जमवल्या होत्या. झद्रनने आतापर्यंत अफगाण संघाकडून दोन कसोटी, 51 वनडे आणि 23 टी-20 सामन्यात 1930 धावा जमवताना एक शतक आणि 11 अर्धशतके नोंदवली आहेत. त्याने चालू वर्षाच्या प्रारंभी लंकेविरुद्धच्या एकमेव कसोटीत आपले कसोटी पदार्पण केले होते.









