वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स
एटीपी टूरवरील येथे सुरु झालेल्या बीएनपी पेरीबस खुल्या इंडियन वेल्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलला कॅनडाच्या मिलोस रेओनिककडून पहिल्याच फेरीत सरळ सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला. नागलने या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळवण्याकरिता पात्र फेरीत पराभूत झाला होता. पण नदालने माघार घेतल्यामुळे नागलला मुख्य स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती.
एटीपीच्या मानांकनात 101 व्या स्थानावर असलेल्या नागलला कॅनडाच्या रेओनिकने 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा सामना 100 मिनिटे चालला होता.









