जांबोटी परिसरातील घटना
खानापूर : तालुक्यातील जांबोटीजवळील विजयनगर येथील एका गर्भवती महिलेने बुधवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास रुग्णवाहिकेतच मुलाला जन्म दिला. याबाबत विजयनगर येथील एका गर्भवती महिलेला बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब 108 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिका विजयनगर येथे दाखल झाली. आणि गर्भवती महिलेला घेऊन सरकारी रुग्णालयात येण्यासाठी निघाले होते. मात्र गर्भवती महिलेला प्रसूती वेदना अधिकच झाल्याने कर्मचाऱ्यांनी जांबोटीजवळ रस्त्याच्या कडेला रुग्णवाहिका थांबवून उपचार केले. त्यावेळी गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला. यानंतर रुग्णवाहिकेतून खानापूर रुग्णालयात आई आणि बाळाला दाखल करण्यात आले आहे. रुग्णवाहिकेतील कर्मचारी बाळव्वा बायर आणि अशोक यांचे कौतुक करण्यात येत आहे.









