एकाच छताखाली बांधकाम क्षेत्राशी संबंधित साहित्य उपलब्ध
बेळगाव : मेणसे गल्ली येथील श्रीराम हार्डवेअर आणि प्लायवूड प्रोडक्सच्या विस्तृत श्रेणीचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी मालक पुंडलिक रामचंद्र हंगिरगेकर, राजेश पुंडलिक हंगिरगेकर, नितीन पुंडलिक हंगिरगेकर, पवन हंगिरगेकर यांच्यासह बांधकाम व्यावसायिक प्रशांत वांडकर, नितीन कित्तूरकर, विठ्ठल पारिश्वाडकर आणि हंगिरगेकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून शुभारंभ झाला. पुंडलिक हंगिरगेकर यांनी 1987 ला या व्यवसायाला प्रारंभ केला आहे. त्यानंतर हा व्यवसाय अधिक विस्तारत गेला. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार प्लायवूड आणि हार्डवेअर प्रोडक्सचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना घरकुल आणि बांधकाम क्षेत्राशी विविध साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. घरकुलाच्या अंतर्गत भागातील हार्डवेअर, डोअर अँड विंडो फिटिंग, किचन ट्रॉलीज, बाथरुम फिटिंग, ग्लास रोलिंग, इंटेरिअल अँड आर्किटेक्चर हार्डवेअर फिटिंग, इंटेरिअल अँड एक्स्टेरिअल पेंट्स उपलब्ध करण्यात आले आहे. त्याबरोबर प्लायवूड डेकोरेटिव्ह लॅमिनेट्स, विंड्रस, डिझायनर्स, पॅनल्स यासह सर्व प्रकारचे डेकोरेटिव्ह डोअर्स उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना विविध व्हरायटी पाहायला मिळणार आहेत. घरकुल संबंधीचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी बंधू, हंगिरगेकर कुटुंबीय उपस्थित होते.









