काबूल :
अफगाणिस्तानच्या विविध प्रांतांमध्ये अतिवृष्टी आणि हिमवृष्टीचा कहर दिसून आला आहे. अतिवृष्टी आणि हिमवृष्टीमुळे किमान 39 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच हजारोंच्या संख्येत पशू मृत्युमुखी पडले आहेत. हिमवृष्टी आणि अतिवृष्टीमुळे 637 घरांचे नुकसान झाले असल्याचे माहिती तालिबानच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे.









