सुधारित दर लागू : घरगुती सिलिंडरचे दर मात्र जैसे थे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. 1 मार्चपासून व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या दरात 25.50 रुपयांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या दरात बदल केला असून सध्या घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. घरगुती सिलिंडरचे दर ऑगस्टमध्ये शेवटचे बदलण्यात आले होते.
एलपीजीचे नवे दर शुक्रवार 1 मार्चपासून देशातील सर्व शहरांमध्ये लागू करण्यात आले आहेत. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. त्यानुसार शुक्रवारी तेल कंपन्यांकडून सिलिंडरच्या किमती विविध शहरांमध्ये अपडेट करण्यात आल्या आहेत. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1795 ऊपयांवर पोहोचली आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांची किंमत 1769.50 ऊपये होती. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,749 ऊपयांवर पोहोचली आहे. कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 24 ऊपयांनी, तर चेन्नईमध्ये 23.50 ऊपयांनी वाढ झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1911 ऊपये आहे. गेल्या महिन्यात त्यांची किंमत 1,887 ऊपये होती. चेन्नईमध्ये सध्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,960.50 ऊपये आहे.
मार्च महिन्यात देशात कमर्शियल सिलिंडर दरात वाढ केली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यानुसार राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 903 ऊपये आहे. तर अन्य शहरांमध्ये हा दर 900 ते 930 रुपयांच्या दरम्यान आहे. 30 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या किमती 200 ऊपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.









