गात अनेक प्रकारची शहरे आहेत. सर्व प्रकारच्या शहरांची स्वत:ची वेगळी वैशिष्ट्यो आहेत. ठरावीक वैशिष्ट्यांमुळे ही शहरे जगभर ओळखली जातात. पॅरिस असो वा फ्रान्सचे व्हेनिस किंवा भारतातील बनारस; प्रत्येकाची स्वत:ची ओळख आहे. सध्या चीनमधील अशाच एका शहराचा एक व्हीडिओ ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये तुम्ही स्वप्नात पाहिल्यासारखे शहर दिसत आहे. या शहराचे नाव चोंगकिंग आहे. आधुनिकतेसाठी हे शहर जगभर प्रसिद्ध होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये शहरात बांधलेली इमारत पाण्यावर तरंगताना दिसत आहे. एका इमारतीच्या गच्चीवर पेट्रोल पंप बांधण्यात आला आहे. पुढे व्हीडिओमध्ये, मेट्रो स्टेशनऐवजी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून येते. जगातील सर्वात मोठा भुयारी मार्गही याच शहरात बांधण्यात आला आहे. त्याचा व्हीडिओ ‘सोशल मीडिया’वर चांगलाच व्हायरल होत आहे. तो आतापर्यंत सुमारे अडीच लाख लोकांनी पाहिला आहे. त्यावर युजरने कमेंट केली आहे की बाकी सर्व काही समजते; पण ही टेन अपार्टमेंटमध्ये का घुसली आहे, हे कळत नाही. आणखी एका युजरने ‘अरे देवा, हे खूप धोकादायक होते’ अशी कमेंट केली आहे.