वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या कतार खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या टॉप सिडेड इगास्वायटेकने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. स्वायटेकने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्वायटेकने इलिना रायबाकिनाचा 7-6 (8-6), 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला.









