लोकमान्य चषक बीडीएफए वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ बीडीएफए फुटबॉल स्पर्धेच्या गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साईराज एफसीने टिळकवाडी इलेव्हन संघाचा तर फास्ट फॉरवर्डने फँको क्लबचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळवले. लव्हडेल स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साईराज संघाने टिळकवाडी इलेव्हनचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 18 व्या मिनिटाला वैभवने पहिला, 44 व्या मिनिटाला वैभवनेच दुसरा गोल करून 2-0 आघाडी मिळवून दिली. 62 व्या मिनिटाला वैभवच्या पासवर प्रज्वलने तिसरा गोल करून 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात फास्ट फॉरवर्ड संघाने फँको संघाचा 6-0 असा पराभव केला. 11 व्या मिनिटाला फास्ट फॉरवर्डच्या नदीम मकानदारने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 13 व्या मिनिटाला नदीमच्या पासवर कलिम मुल्लाने गोल करून 2-0 व 23 व्या मिनिटाला रिहानच्या पासवर नदीमने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 46 व्या मिनिटाला कलिम मुल्लाच्या पासवर नदीमने चौथा गोल केला. 64 व्या मिनिटाला नदीमच्या पासवर रिहान नदाफने पाचवा गोल केला तर 68 व्या मिनिटाला नदीमने बचाव फळीला चकवत गोल करून 6-0 ची आघाडी मिळवून दिली.
शुक्रवारचे सामने : मोहब्ल्यू वि. ब्रदर्स दु. 3 वा., इलेव्हन स्टार वि. स्वस्तिक साय. 5 वा.









