शिमगोत्सव मिरवणुकांचे वेळापत्रक तयार : 26 मार्चपासून 8 एप्रिलपर्यंत आयोजन
पणजी : राज्यातील प्रमुख उत्सवांपैकी एक असलेला उत्सव म्हणजे शिमगोत्सव. या शिमगोत्सवाला यंदा 26 मार्चपासून प्रारंभ होणार असल्याने काही दिवसांतच ‘ओस्सयऽऽ ओस्सयऽऽऽ’चा नाद घुमणार आहे. पर्यटन खात्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या शिमगोत्सवाचे वेळापत्रक तयार झाले असून 26 मार्च ते 8 एप्रिल 2024 या दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी शिमगोत्सव मिरवणुका तसेच कला, सांस्कृतिक, स्पर्धात्मक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. म्हार्दोळ येथील श्री महालसा देवीला श्रीफळ ठेवल्यानंतर फोंड्यातून या शिमगोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
शिमगोत्सव मिरवणुकांचे वेळापत्रक
- मंगळवार 26 मार्च फोंडा
- बुधवार 27 मार्च कळंगुट
- गुऊवार 28 मार्च सांखळी
- गुरुवार 28 मार्च डिचोली
- शुक्रवार 29 मार्च वाळपई
- शनिवार 30 मार्च पणजी
- रविवार 31 मार्च पर्वरी
- सोमवार 1 एप्रिल पेडणे
- मंगळवार 2 एप्रिल काणकोण
- बुधवार 3 एप्रिल वास्को
- गुऊवार 4 एप्रिल शिरोडा
- गुरुवार 4 एप्रिल कुडचडे
- शुक्रवार 5 एप्रिल केपे
- शुक्रवार 5 एप्रिल धारबांदोडा
- शनिवार 6 एप्रिल मडगाव
- रविवार 7 एप्रिल म्हापसा
- रविवार 7 एप्रिल सांगे
- सोमवार 8 एप्रिल कुंकळ्ळी









