महांतेश कवटगीमठ ऑल इंडिया क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : मराठा स्पोर्ट्स क्लब आयोजित महांतेश कवटगीमठ चषक ऑल इंडिया क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात झालेल्या सामन्यातून आरसीसी अनगोळ संघाने पीजी स्पोर्ट्स व मराठा स्पोर्ट्स ग्रामीणचा, तर पांडुरंग सीसीने रिशन स्पोर्ट्सचा व सोमनाथ डेव्हलपर्सचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. ओमकार हरपल, रजत, सुमित डोंगरे, रोहन यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मराठा स्पोर्ट्स आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आरसीसी अनगोळ संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 109 धावा केल्या. त्यात ओंकार हरपलने नाबाद 48, सुमित डोंगरेने 26 व पारस ठाकूरने 17 धावा केल्या. पीजी स्पोर्ट्स तर्फे झमीरने 3 गडी बाद केले . प्रत्युत्तरादाखल खेळताना पीजी स्पोर्ट्सने 8 षटकात 7 गडीबाद 65 धावा केल्या. त्यात अझर अश्रफने 26, तर आमनने 10 धावा केल्या. आरसीसी तर्फे अक्षय पाटील व सोहेल धारपवार यांनी प्रत्येकी 2, तर अक्षय मराठे, रोहित गाराटे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात पांडुरंग सीसीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 2 गडी बाद 139 धावा केल्या. रजतने नाबाद 70, रूपेशने 54 धावा केल्या. रीशन स्पोर्ट्सतर्फे अमन कुराडे, सचिन यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रिशान स्पोर्ट्सने 8 षटकात 5 गडीबाद 49 धावा केल्या. त्यात साहिल जाधवने 11 तर सचिन 10 धावा केल्या. पांडुरंग सीसीतर्फे गौरेश, अमर, प्रणय, रजत यांनी प्रत्येकी एक गडीबाद केला.
तिसऱ्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स ग्रामीण संघाने प्रथम फलंदाजी करताना. 8 षटकात 6 गडी बाद 66 धावा केल्या. आरसीसी अनगोळतर्फे अक्षय पाटीलने 2 तर प्रसन्ना व रोहित यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आरसीसी अनगोळने 5.5 षटकात 4 गडी बाद 71 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात सुमित डोंगरेने नाबाद 37, अक्षय पाटीलने 11 धावा केल्या. मराठा स्पोर्टसतर्फे सुशांत कुवाडकरने 2, अभिजीत पाटील व भरत गाडेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. चौथ्या सामन्यात सोमनाथ डेव्हलपर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 67 धावा केल्या. त्यात झैदने 25, मनोज मानेने 18 तर विजयने 13 धावा केल्या. पांडुरंग सीसीतर्फे साहिलने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पांडुरंग सीसीने 7.3 षटकात 8 गडी बाद 71 धावा करून सामना 2 गड्यांनी जिंकला. त्यात रुपेशने 26, रोहनने 19 धावा केल्या. सोमनाथ डेव्हलपर्स तर्फे विजय 4, अब्बास व संतोष यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अप्पना बुद्रुक, रवी पुरेकर, प्रवीण पाटील, संतोष कडोलकर, भरत कराडी, महावीर जैनोजी, अमित तिबिले, नदीम मुल्ला, राजू बडवाण्णाचे, मारुती पाटील, प्रवीण घाडी, तुषार चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते ओमकार हरपल, रजत, सुमित डोंगरे, व रोहन यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
बुधवारचे सामने : 1) नारायण स्पोर्ट्स विरुद्ध डी.जे. बॉईज सकाळी 9. 2) प्रथमेश मोरे विरुद्ध व्ही. आर सिरामिक स. 10.30 वा., 3) एकता स्पोर्ट्स विरुद्ध पहिल्या सामन्यातील विजेता दुपारी 12.30 4) आरसीसी अनगोळ विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजेता दुपारी 1.30 वाजता.









