नवी दिल्ली
कोल इंडिया लिमिटेडच्या डिसेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात जवळपास 16.9 टक्क्यांनी वाढ झाली असून या वाढीसोबत नफा 9,069.19 कोटी रुपयावर राहिला आहे. नियामक फायलिंगनुसार कोल इंडियाने मागील वर्षाच्या कालावधीत त्यांचा एकत्रित नफा हा 7,755.55 कोटी रुपये इतका नोंदवला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीचा महसूल वाढून 36,153.97 कोटी रुपयावर राहिला आहे. जो एका वर्षापूर्वी 35,169.33 कोटी रुपये होता. देशांतर्गत कोळसा उत्पादन सीआयएलचा वाटा हा 80 टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे.









