एकत्र वास्तव्यासोबत घेतात जीवनाचा आनंद
भारतासमवेत जगभरात एकल परिवारांची संख्या वेगाने वाढत आहे. लोक एकाकी राहत आहेत. तर ब्रिटनमध्ये एक अनोखे गाव आहे, जेथे गावातील प्रत्येक सदस्य परिवाराप्रमाणे राहतो. येथे सर्व लोक मिळून राहतात, खातात आणि जीवनाचा आनंद घेतात. एखादी समस्या उदभवल्यास सर्व जण मिळून ती सोडवतात. येथे कुणीच एकटा नाही, रोज संध्याकाळी लोकांची मैफल जमते आणि वृद्ध देखील याचा आनंद घेतात.
ब्रिटनमधील को-कम्युनिटी गाव कॅनॉक मिल सध्या चर्चेत आहे. आर्किटेक्ट ऐनी थॉर्न यांनी मित्रांच्या एका समुहासोबत मिण्tन 2.5 एकरमध्ये या इको-व्हिलेलज वसविले आहे. ऐनी थॉर्न लंडनच्या लाइफस्टाइलमुळे वैतागून गेल्या होत्या, निवृत्तीनंतर त्यांना शांतता आणि आराम हवा होता. सर्व जण मिळून मिसळून राहतील असे ठिकाण निर्माण करण्याची त्यांची इच्छा होती.
2006 मध्ये एकेदिवशी मित्रांसोबत बसले असताना वृद्ध, मुले, महिला आणि पुरुष सर्वांनी मिळून रहावे अशाप्रकारचे स्थळ निर्माण करण्याचा विचार त्यांना सुचला. येथूनच या अनोख्या गावाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ऐनी थॉर्न यांना हे गाव वसविण्यासाठी 13 वर्षे लागली आहेत.
2019 मध्ये जेव्हा सर्व मित्र निवृत्त झाले आणि सर्व जण आपाआपल्या घरांमध्ये राहण्यास गेले तेव्हा ऐनी यांना एकटेपणा जाणवू लागला. नंतर ऐनी यांनी सर्वांना एकत्र आणत 1.2 दशलक्ष डॉलर्समध्ये जमीन खरेदी केली. तेव्हा केवळ 8 परिवार येथे राहत होते, हे परिवार पूर्ण पेन्शन याचकरता खर्च करत होते. आता हे पूर्ण भरलेले गाव आहे, जेथे सर्व लोक स्वत:च्या कुटुंबासमवेत राहत आहेत.
येथे राहणारे लोक मिळूनच स्वयंपाक करतात. कार पूल करतात, जेणेकरून कुणाला कामावर जाण्यासाठी अडचण भासू नये, सर्व जण मिळून नव्या कौशल्याचे धडे गिरवितात, परस्परांना शिकवितात आणि ते देखील कुठलेही शुल्क न आकारता.
आम्हाला फक्त एकमेकांचे हात पकडून सुरुवात करायची होती आणि एक दिवशी आमचे हे स्वप्न पूर्ण झाले. आम्ही समुदायापासून वेगळे राहू इच्छित नाही. परंतु त्यांची लाइफस्टाइल आम्हाला पसंत नाही. येथे प्रत्येक चेहऱ्यावर हास्य आहे, आम्ही एक व्हॉट्सग्रूप तयार केला आहे. येथे लोक जीवनाचा आनंद घेतात असे ऐनी यांचे सांगणे आहे.
मधमाशी पालन, मातीची भांडी तयार करणे येथी लोकांचा पारंपरिक पेशा आहे. परंतु दैनंदिन यात काही तरी नव्या गोष्टीची भर घातली जाते. येथे वसलेले प्रत्येक घर आत्मनिर्भर आहे, तरीही सर्व लोकांना एकत्र घेत वाटचाल केली जाते. गरज भासल्यास संबंधितांना मदत करण्यात येते असे त्यांचे सांगणे आहे.









