ओटीटीवर प्रदर्शित होणार चित्रपट
पंकज त्रिपाठी, सारा अली खान आणि करिश्मा कपूर एकत्र दिसून येणार आहेत. तिघेही ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटातून झळकणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. 15 मार्चपासून हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. संजय कपूर, विजय वर्मा, टिस्का चोप्रा, डिंपल कपाडिया आणि सुहैल नय्यर देखील यात मुख्य भूमिकेत आहेत.
पंकज त्रिपाठी यात पोलिसाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले आहे. तर निर्मिती मॅडडॉक फिल्म्सच्या दिनेश विजान यांच्याकडून करण्यात आली आहे. हा चित्रपट अनुजा चौहान यांचे पुस्तक क्लब यू टू डेथवर आधारित आहे.
एका हत्येप्रकरणी 7 संशयित असल्याचे दर्शविणारी ही कहाणी असणार आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद सुप्रोतिम सेनगुप्ता आणि गजल धालीवाल यांचे आहेत. ही एक विविध रंगांनी नटलेली मर्डर मिस्ट्री असून यात प्रेक्षकांना सुगावा शोधण्यास मजा येईल असे दिग्दर्शक होमीने म्हटले आहे. सारा अली खान आणि करिश्मा कपूर हे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.









