वृत्तसंस्था/ लाहोर
अनुभवी आणि ज्येष्ठ प्रशासक सय्यद मोहसिन रझा नक्वी यांची पाक क्रिकेट मंडळाच्या चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली. पीसीबीच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी ही घोषना केली. नक्वी आता 3 वर्षांच्या कालावधीसाठी पीसीबीचे चेअरमन म्हणून राहतील.
लाहोरमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रांगणात असलेल्या कार्यालयात पीसीबीच्या कार्यकरणी समितीची खास बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये चेअरमनपदासाठीची निवडणुक घेण्यात आली. या निवडणुकीत नक्वी यांची एकमताने निवड करण्यात आली. 45 वर्षीय नक्वी आता पीसीबीचे 37 वे पूर्ण वेळेसाठीचे चेअरमन राहतील.









