तिसऱ्या तिमाहीमधील आकडेवारी सादर : महसूलातही 5.8 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
दुरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे (ऑक्टोबर-नोव्हेंबर) निकाल जाहीर केले आहेत. सोमवारी कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 2,442.2 कोटी रुपये होता, जो वार्षिक 54 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
महसूल 5.8 टक्क्यांनी वाढून 37,899 कोटी रुपये इतका झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,588.2 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला होता. कंपनीला तिसऱ्या तिमाहीतील कामकाजातून एकत्रित महसूल देखील वार्षिक 5.8 टक्क्यांनी वाढून 37,899.5 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत महसूल 35,804.4 कोटी रुपये होता.









