नवी दिल्ली :
नियमित जामिनापूर्वी आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील आरोपी मनीष सिसोदिया यांना पत्नीला भेटण्याची परवानगी मिळाली आहे. राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना पोलीस कोठडीत असलेल्या पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी दिली आहे. राऊस एव्हेन्यू न्यायालय त्यांच्या नियमित जामिनावर 12 फेब्रुवारीला सुनावणी करणार आहे. सिसोदिया यांनी आपल्या आजारी पत्नीला पोलीस कोठडीत असताना आठवड्यातून दोन दिवस भेटण्याची परवानगी मागितली होती. सीबीआयने त्यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी मद्य घोटाळ्यातील कथित भूमिकेसाठी अटक केली होती. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची ईडीकडूनही चौकशी सुरू आहे.









