अबू धाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सज्ज

संपूर्ण पश्चिम आशिया किंवा मध्य पूर्वेतील हे पहिले पारंपरिक हिंदू दगडी मंदिर असेल

हे मंदिर सुमारे 700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे

अबू मुरेखा येथे 27 एकर जागेवर स्वामीनारायण संस्थेद्वारे मंदिर बांधले जात आहे.

मंदिराची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की ते रिश्टर स्केलवर ७ रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकेल.

मंदिरांच्या दर्शनी भागामध्ये भारतीय कारागिरांनी 25000 हून अधिक दगडी तुकड्यांपासून तयार केलेले उत्कृष्ट संगमरवरी नक्षीकाम आहे

18 फेब्रुवारीला मंदिर लोकांसाठी खुले होणार आहे