वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेतर्फे नुकताच नाटेकर स्पोर्टस आणि गेमिंग बरोबर दीर्घ कालावधीचा करार झाला असून आता देशात पहिली पिकलबॉल लीग स्पर्धा भरविली जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये विविध देशांचे स्पर्धक सहभागी होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी सांगितले. हा क्रीडाप्रकार जगातील 92 देशांमध्ये आतापर्यंत खेळविला जात आहे. भारतामध्ये पहिल्यांदा क्रीडा शौकीनांना हा क्रीडा प्रकार पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून यामध्ये देशातील 21 राज्यातील स्पर्धक सहभागी होत आहेत.









