नरेवाडी येथे घडली घटना : सोनोली गावावर शोककळा
वार्ताहर /किणये
एका घराचे सेंट्रींग काम करीत असताना विद्युत भारित तारेच्या स्पर्शाने सोनोली गावच्या सेंट्रींग कामगाराचा मृत्यू झाला आहे. नरेवाडी तालुका चंदगड येथे सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली असून रघुनाथ नारायण पाटील (वय 54) राहणार सोनोली असे त्या कामगाराचे नाव आहे.या घटनेमुळे सोनोली गावावर शोककाळा पसरली आहे. रघुनाथ पाटील हे सेंट्रींगचे कामकाज करीत होते. या सेंट्रींग व्यवसायामध्ये त्यांनी चांगलाच जम बसविला होता. नरेवाडी तालुका चंदगड येथील शेत शिवारामध्ये त्यांचे काम सुरू होते. एका घरावर सेंट्रींगचे काम करीत असताना, लोखंडी बार घेऊन ते जात होते. याचवेळी सर्विस विद्युत भारित तारेचा स्पर्श सदर लोखंडी बारला झाला. त्यामुळे त्यांना विद्युत पुरवठ्याचा तीव्र झटका बसला आणि ते खालीच पडले.
यावेळी सदर घरावर काम करण्राया अन्य कामगारांना काहीच कळाले नाही. स्रायांची धावपळ उडाली होती. लागलीच त्यांना कारवे येथील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले .मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना बेळगाव मधील के एल इ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचारासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र विद्युत भारी तारेचा त्यांना तीव्र झटका बसला होता यामुळे त्यांची हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आणि ते मृत्यू पावले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सोमवारी सायंकाळी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. याबाबतची माहिती गोपाळ कडोळकर यांनी दिली. रघुनाथ पाटील सोनाली गावातील एक उत्कृष्ट असे सेंट्रींग कामगार होते. असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सोनोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ-बहीण असा परिवार आहे. रघुनाथ यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या घरच्या सदस्यांनी एकच आक्रोश केला होता.अंत्यविधीय मंगळवारी दुपारी होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.









