राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते विशेष सन्मान
पणजी : गोव्याच्या वीज खात्याचे वरिष्ठ अभियंते अरुण पाटील यांचा खात्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशेष सन्मान करण्यात आला. अभियंते पाटील गेल्या अनेक वर्षांपासून गोवा सरकारच्या वीज खात्यामध्ये सक्रिय आहेत. गोव्यात झालेल्या विविध उपक्रमांमध्ये विशेष सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारच्या वतीने हा विशेष सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, विशेष पदक आणि मानपत्र देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, नौदल, लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. बेळगावच्या गवळी गल्ली येथील निवृत्त शिक्षक कै. रामराव पाटील यांचे ते मुलगे आहेत.









