वृत्तसंस्था/ तेवांग
5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान भारत आणि चीन सरहद्दीवर असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे आंतरराष्ट्रीय कायकिंग स्पर्धा घेतली जाणार आहे. तवांगचू नदीच्या संगमावर ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धक सहभागी होत आहेत. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडु आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजु यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा भरविली जात आहे. तेवांग जवळील लुमाला येथील तेवांगचु नदीमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे.