कर्तव्यपथावर नारी शक्तीचे उत्साही दर्शन : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती
नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत यंदा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. भारताने शुक्रवारी आपला 75 वा प्रजासत्ताक दिन आपल्या महिला शक्ती, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि क्षेपणास्त्रे, युद्ध विमाने, पाळत ठेवणारी उपकरणे आणि प्राणघातक शस्त्रास्त्रे असलेल्या लष्करी सामर्थ्याच्या भव्य प्रदर्शनासह साजरा केला. नवी दिल्लीतील या दिमाखदार सोहळ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
भारताच्या राजधानी दिल्लीत मध्यवर्ती असलेल्या या कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सलामी घेतल्यानंतर झाली. प्रमुख्य अतिथी असणारे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना भारतीय राष्ट्रपतींसमवेत ‘पारंपरिक बग्गी’मधून आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, इतर अनेक केंद्रीय मंत्री, देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी, विदेशी राजदूत आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत शेकडो दिल्लीकर या प्रभावशाली कार्यक्रमाचे साक्षीदार होते. मुख्य सोहळ्यानंतर पथसंचलनादरम्यान देशाच्या वाढत्या ‘नारी शक्ती’चे प्रतिबिंब दाखवणाऱ्या सर्व महिलांच्या त्रि-सेवा दलाने कर्तव्य पथावरून कूच केले. तसेच हेलिकॉप्टर आणि विमानांद्वारे गुऊत्वाकर्षणाचा प्रतिकार करणाऱ्या फ्लाय-पास्टचा समावेश होता. परेड संपल्यानंतर पंतप्रधान मोदी ते अगदी उत्साही गर्दीत मिसळून गेले. यावेळी फोटोछूटही करण्यात आले. तसेच ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेले.
कर्तव्यपथावर शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातून ‘नारी शक्ती’ या विषयावर प्रकाशझोत टाकला गेला. त्यात ग्रामोद्योग, सागरी क्षेत्र, संरक्षण, विज्ञान ते अंतराळ तंत्रज्ञान या विविध क्षेत्रांमध्ये महिलांची निर्णायक भूमिका अधोरेखित केली होती. लोकवाद्यापासून ते आदिवासी तालवाद्यांपर्यंत 112 महिला कलाकारांच्या बँडने ते कुशलतेने वाजवले. महिलांच्या सामर्थ्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक याप्रसंगी देशवासियांना दिसले. मणिपूर, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांनी विविध क्षेत्रांतील महिलांच्या भूमिका आपल्या चित्ररथांमधून दाखवल्या. मणिपूरच्या चित्ररथात प्रसिद्ध लोकटक सरोवरातून कमळाच्या काड्या गोळा करणाऱ्या आणि पारंपारिक चरखे वापरून नाजूकपणे सूत रचणाऱ्या बोटीवरील महिला दाखवल्या. मध्य प्रदेशच्या झांकीने कल्याणकारी योजनांद्वारे राज्याच्या विकास प्रक्रियेत महिलांचे एकत्रीकरण दाखविले. आधुनिक सेवा क्षेत्रे, लघुउद्योग आणि पारंपारिक क्षेत्रांमध्ये महिलांच्या सक्रिय सहभागावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
डीआरडीओच्या संचलनात संरक्षण आणि संशोधन या प्रमुख क्षेत्रात महिला शास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला. त्यात उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र आणि थर्ड-जनरेशन अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र यांसारख्या कामगिरीचे वैशिष्ट्या आहे. तसेच बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने भारताच्या सागरी क्षेत्राच्या विकासाचे प्रदर्शन केले, महिला खलाशांच्या संख्येत वाढ आणि दीपगृह आणि क्रूझ पर्यटनातील प्रगती यावर भर दिला.
शौर्य आणि जिद्दीचे दर्शन
मोटारसायकलवर 265 महिलांनी विविध धाडसी स्टंटद्वारे शौर्य आणि जिद्द दाखवली. त्यांनी योगासह भारतीय मूल्ये आणि संस्कृतीचे सामर्थ्य देखील प्रदर्शित करतानाच एकतेचा आणि सर्वसमावेशकतेचा संदेश दिला. दिल्ली पोलिसांच्या महिला बँडने यंदा प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला. त्याचे नेतृत्व बँड मास्टर सब-इन्स्पेक्टर ऊयांगुनूओ केन्से यांनी केले. परेडमध्ये 148 पॅडेट्सचा समावेश असलेल्या एनसीसीच्या गर्ल बँड पथकानेही सहभाग घेतला.
नृत्यांचाही सहभाग
सांस्कृतिक समृद्धता आणि नारीशक्तीच्या नेत्रदीपक प्रदर्शनात, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ‘वंदे भारतम’च्या तिसऱ्या आवृत्तीत ‘स्त्री शक्तीची सांस्कृतिक अभिव्यक्ती – संकल्पाद्वारे सिद्धी’ या थीमचे प्रदर्शन करण्यात आले. ‘वंदे भारतम-नारी शक्ती’च्या बॅनरखाली 1500 कलाकारांच्या गटाने कुचीपुडी, कथ्थक, भरतनाट्याम, सत्रिया, मोहिनीअट्टम, ओडिसी, मणिपुरी, समकालीन शास्त्रीय नृत्य आणि बॉलीवूड यासह 30 विशिष्ट लोकनृत्य शैलींसह विविधतेत एकता दाखवून दिली.
हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती
हवाई दलाच्या हवाई कसरतींनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यात लढाऊ विमानांनी 900 किमी प्रतितास या वेगाने केलेल्या कसरती उपस्थितांचे डोळे दिपवणाऱ्या होत्या. कर्तव्यपथावरील आकाशात भारतीय हवाई दलाच्या जवानांनी चित्तथरारक कसरती कऊन दाखवल्या. यावेळी, भारताच्या सहा राफेल फायटर जेटने वजरंग आसनातील कसरत हवेत कऊन दाखवली. तर, सुखोई 30 एमके विमानांनी 900 किमी प्रतितासाच्या वेगाने हवेत कसरती केल्या. यावेळी, त्यांनी तीन विमान एकत्रित कऊन त्रिशुळ ही संकल्पना सादर केली होती. यावेळी, कर्तव्य पथावरील नागरिकांना टाळ्या वाजवून दाद दिली.
शंभरहून अधिक महिला कलाकारांनी परेडची सुऊवात पारंपारिक लष्करी बँडऐवजी सांख, नादस्वरम आणि नगाडा यांसारखी भारतीय वाद्ये वाजवून उत्सवाची सुऊवात केली. टी-90 भीष्म रणगाडे, एनएजी क्षेपणास्त्र प्रणाली, पायदळ लढाऊ वाहने, सर्व भूभागावरील वाहने, शस्त्र शोधणारी रडार यंत्रणा, ड्रोन जॅमर यंत्रणा आणि मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख प्रदर्शनांमध्ये होती. दोन राफेल लढाऊ विमाने आणि फ्रेंच वायुसेनेचे एक एअरबस ए330 मल्टी-रोल टँकर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट देखील या उत्सवात सहभागी झाले होते. भारतीय हवाई दलाच्या 46 विमानांनी जॉ ड्रॉपिंग फ्लाय-पास्ट करून या उत्सवाची सांगता झाली.
आयएएफच्या ताफ्यात 29 लढाऊ विमाने, सात वाहतूक विमाने, नऊ हेलिकॉप्टर आणि एक हेरिटेज विमान यांचा समावेश होता. ही सर्व विमाने सहा वेगवेगळ्या तळांवरून कार्यरत होती. फायटर स्ट्रीममधील सहा महिला वैमानिकांसह पंधरा महिला वैमानिकांनी फ्लाय-पास्ट दरम्यान भारतीय हवाई दलाच्या प्लॅटफॉर्मचे संचालन केले. प्रथमच स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाने चार विमानांच्या स्वरूपात उ•ाण केले. यापूर्वी एक तेजस जेट प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा भाग होता परंतु विमानाने फॉर्मेशनमध्ये उ•ाण करण्याची ही पहिलीच वेळ होती.
राजपथावर अवतरले विविध राज्यांचे चित्ररथ
राजपथावर देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिकतेचे दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांचे प्रदर्शन झाले. अऊणाचल प्रदेश, हरियाणा, मणिपूर, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा , राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, लडाख, तामिळनाडू, गुजरात, मेघालय, झारखंड, उत्तर प्रदेश आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचे चित्ररथ प्रजासत्ताकदिनी सहभागी झाले होते. या चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उत्तर प्रदेश सरकारने रामललाचे दर्शन घडवले, तर महाराष्ट्र सरकारने बाल शिवाजीचे ऊप साकारल्याचे पाहायला मिळाले. यासह, सैन्य दलाच्या कवायती आणि परेड पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला. यामध्ये राजपथावर बुलेट व दुचाकी वाहनावऊन जवानांनी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कसरती कऊन दाखवल्या. ‘विकसित भारत’ आणि ‘भारत-लोकतंत्र की मातृका’ या संकल्पनेवर आधारित यंदाची परेड संपन्न झाली. यंदा प्रथमच समाजातील सर्वच वर्गातील नागरिकांना प्रातिनिधीक स्वऊपात राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भाग घेता आला. राजपथावरील यंदाच्या परेड सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. तब्बल 14 हजार जवान प्रमुख पाहुणे व नागरिकांच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून उभे होते.