कणकुंबी : अयोध्या येथे पार पडलेल्या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व मंदिराच्या लोकार्पण सोहळ्dयानिमित्त कणकुंबी येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त सकाळी गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी भजन दिंडीसह वाजतगाजत मिरवणुकीने प्रभू रामचंद्रांचा रथ सजवून मिरवणुकीसह लिंग देवस्थानपासून सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांतर्फे रामेश्वर मंदिर, श्री माउली देवी मंदिर, हनुमान मंदिर, चव्हाटा मंदिर व दत्त मंदिरासह सर्व मंदिरांत अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर रामनाम जप, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र पठण करण्यात आले. त्यानंतर श्री माउलीदेवी मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी मंदिरात भजन व दीपोत्सव करण्यात आला. यामुळे गावातील वातावरण भगवेमय झाले होते.
श्री माउली विद्यालयात विविध कार्यक्रम
येथील श्री माउली विद्यालयात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या लोकार्पण सोहळ्dयानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर मंगल तोरण उभारले होते. रांगोळ्dया रेखाटल्या होत्या. तसेच भगव्या व विविध रंगांच्या पताका बांधून वातावरण प्रसन्न बनवले होते. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना लोकार्पण सोहळ्dयाचे थेट प्रसारण दाखविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांनी रामायणातील प्रसंगांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.









