कर्नाटक दलित संघर्ष समितीच्यावतीने जिल्हास्तरीय दलित संमेलन
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक दलित संघर्ष समिती, आंबेडकर वाद या संघटनेच्यावतीने संविधानाच्या रक्षणासाठी व लोकशाही टिकविण्यासाठी जिल्हास्तरीय दलित संमेलन आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या संरक्षणासाठी जागृती फेरी आंबेडकर मार्ग, चन्नम्मा सर्कल, जिल्हाधिकारी कार्यालय, जुना पी. बी. रोड या मार्गे जाऊन कुमार गंधर्व रंगमंदिर येथे संमेलन घेण्यात आले.
महांतेश तळवार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक मल्लेश चौगुले यांनी केले. यावेळी दीपप्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आमदार राजू सेठ यांनी पुष्पहार अर्पण केला. संविधानाचे रक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. संमेलन यशस्वी होण्यासाठी मल्लेश चौगुले, सिद्धाप्पा कांबळे, महादेव तळवार, रामा चव्हाण, दीपक धबाडे यांच्यासह सर्व सदस्य आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन कराप्पा गुंडेन्नावर यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू सेठ, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, प्रा. के. डी. मंत्रेशी, अॅड. आनंद संद्रीमनी, कर्नाटक संघर्ष समिती आंबेडकर वाद राज्य संघटना संचालक सिद्धाप्पा कांबळे, दलित समाजाचे नेते मल्लेश चौगुले, राज्य प्रधान संचालक मावळी शंकर, सुरेश तळवार, संतोष भीमपुत्र आदी बहुसंख्येने उपस्थित होते.









