वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या इंडिया खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चीन तैपेईची बॅडमिंटनपटू तेई झू यिंगने महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य सामन्यात सिंगापूरच्या मिनचा पराभव केला.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या चीन तैपेईच्या यिंगने शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात सिंगापूरच्या मिनचा 21-13, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. 2024 च्या बॅडमिंटन हंगामात माजी टॉप सिडेड यिंगने सलग दुसऱ्या फेरीत अंतिम फेरी गाठली आहे. गेल्या आठवड्यात तिला मलेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.









