सानिया मिर्झाला घटस्फोट दिल्याचेही स्पष्ट
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
शोएब मलिक आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची अनेक दिवसांपासून चर्चा असतानाच आता पाकिस्तानी क्रिकेटरने आपल्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदसोबत विवाह केला आहे. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झापासून त्याच्या घटस्फोटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. शोएब आणि सानियाला पाच वर्षांचा मुलगाही असून तो सानियासोबत राहतो. शोएबने शनिवारी 20 जानेवारी रोजी सोशल मीडियावर आपल्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले. सना जावेद ही पाकिस्तानी अभिनेत्री असून तिने 2012 साली शेहर-ए-जात या मालिकेतून आपल्या करिअरची सुऊवात केली होती. मात्र, रोमँटिक ड्रामा ‘कहानी’मध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर तिचे विशेष ओळख निर्माण झाली होती.









