देसूर हद्दीतील प्रकारामुळे जागा मालकाकडून तक्रार
बेळगाव : देसूर हद्दीतील अल्मा मोटार कारखान्याजवळील तीन एकर जमिनीतील झाडे तोडून रस्ता करण्याचा प्रयत्न काही अज्ञातांनी केला. याबाबत जमीन मालकांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे. सर्व्हे क्रमांक 373 मधील झाडे तोडून अचानक त्या ठिकाणीहून रस्ता केला. याची माहिती काही जणांनी जमीन मालक रिटा संतोष यांना दिली. त्या तातहीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी संपूर्ण पाहणी केली असता तेथे कोणीच नसल्याचे दिसून आले. जमिनीतील झाडे तोडल्यामुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. करण्यात आलेला रस्ता बंद केला असून, त्या रस्त्यावरील तोडण्यात आलेली झाडे टाकण्यात आली आहेत. कोणतीही पूर्व कल्पना न देता अज्ञातांनी या जागेतून रस्ता करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.









