वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतला इंडिया ओपन सुपर 750 स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. हाँगकाँगच्या ली चेयुक यियूने त्याला पराभवाचा धक्का दिला.
पहिल्या फेरीच्या या सामन्यात अनेक अप्रतिम फटके मारले. पण त्याच्याकडून अनियंत्रित चुकाही झाल्या. पहिल्या गेममध्ये दोघांचा तोडीस तोड खेळ झाल्याने चांगली चुरस पहावयास मिळाली. पण शेवटी हा सामना जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानावर असणाऱ्या ली चेयुकने 24-22, 21-13 असा जिंकत आगेकूच केली. महिला दुहेरीत जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानावर असणाऱ्या तनिशा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा यांचे आव्हानही संपुष्टात आले. जागतिक दहाव्या मानांकित थायलंडच्या जाँगकोल्फन किटिथराकुल व रविंदा प्रजाँगजय यांनी त्यांच्यावर 5-21, 21-18. 11-21 अशी मात केली.









