नवी दिल्ली:
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स एसयुव्ही गटात पंच ही इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल करणार आहे. येत्या बुधवारी 17 जानेवारीला या गाडीचे लाँचिंग होणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरची कार ही एका चार्जनंतर जवळपास 300 ते 400 किमीचे मायलेज देणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे.सदरची इलेक्ट्रिक पंच ही गाडी ग्राहकांना बुक करता येणार आहे. बुकिंगला सुरुवात झाली असून 21 हजार रुपये आगाऊ भरुन ही गाडी ग्राहकांना बुक करता येईल. सदरच्या गाडीची स्पर्धा सिट्रोएन इसी3 या गाडीशी होणार आहे.
किती असणार किंमत
सदरच्या गाडीची किंमत एक्सशोरुम 10 लाख ते 13 लाखाच्या आत असणार आहे. स्टँडर्ड आणि लाँग रेंजमध्ये दोन प्रकारात ही गाडी सादर होणार असून 25 केडब्ल्यूएच बॅटरी व 35 केडब्ल्यूएच बॅटरी पर्यायासह येईल. स्टँडर्डमध्ये 3.3 किलोवॅटचा एसी चार्जर तर लाँगमध्ये 7.2 केडब्ल्यू एसी चार्जर मिळणार आहे.