हिंदू भोवी समाजाचा महापालिकेवर मोर्चा-निवेदन
बेळगाव : महानगरपालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक म्हणून काम करत असलेले यल्लेश बच्चलपुरी हे राजकारण करत आहेत. अनेकांना धमकी देत आहेत. तरी त्यांची बदली करावी, या मागणीसाठी हिंदु भोवी व•र समाज खासबाग यांच्यावतीने महानगरपालिकेवर मोर्चा काढून मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून यल्लेश बच्चलपुरी हे महानगरपालिकेमध्ये निरीक्षक म्हणून म्हणून काम करत आहेत. मात्र हे करताना प्रभागांमधील नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. ईबेळगावी.कॉमच्या माध्यमातून ते गैरप्रकार करत आहेत. त्यावरही बंदी घालावी, अशी मागणीही निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. त्यांची तातडीने इतरत्र बदली करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील देण्यात आले आहे. आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी निवेदन स्वीकारले. याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. सदर मागणीचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले आहे. यावेळी तानाजी गुंजीकर, नागाप्पा दंडगल, परमेश करीकट्टी, शिवा चौगुले, अशोक येळ्ळूरकर, शंकर बोटेकर, चरण धोत्रे, सोमनाथ दंडगल यांच्यासह समाजातील नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.









