वृत्तसंस्था/ मुंबई
2024 च्या रणजी हंगामातील येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या इलाईट ब गटातील सामन्यात आंध्र विरुद्ध खेळताना यजमान मुंबईने पहिल्या डावात 6 बाद 281 धावा जमविल्या. भूपेन लालवाणीने शानदार अर्धशतक (61) झळकवले. आंध्रतर्फे नितीशकुमार रे•ाrने 3 गडी बाद केले.
या सामन्यात आंध्रने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. लालवाणी आणि बिस्ता यांनी सलामीच्या गड्यासाठी 69 धावांची भागिदारी केली. बिस्ताने 6 चौकारांसह 39 तर लालवाणीने 10 चौकारांसह 61 धावा जमविल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे खाते उघडण्यापूर्वीच पायचीत झाला. सुवेद पारकर आणि श्रेयस अय्यर या जोडीने चौथ्या गड्यासाठी 62 धावांची भर घातली. पारकरने 4 चौकारांसह 41 तर अय्यरने 7 चौकारांसह 48 धावा जमविल्या. प्रसाद पवार 15 धावांवर बाद झाला. मुल्लानी आणि कोटियान यांनी सातव्या गड्यासाठी अभेद्य 57 धावांची भागिदारी केली. मुल्लानी 2 चौकारांसह 30 तर कोटीयान 4 चौकारांसह 31 धावावर खेळत आहे. आंध्रतर्फे नितीशकुमार रे•ाrने 3 तर शोएब मोहम्मद खानने 2 तसेच ललीत मोहनने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – मुंबई प. डाव 88 षटकात 6 बाद 281 (बिस्ता 39, लालवाणी 61, पारकर 41, अय्यर 48, मुल्लानी खेळत आहे 30, कोटियान खेळत आहे 31, रे•ाr 3-44).









