नवी दिल्ली :
व्यावसायिक वाहन निर्माती कंपनी अशोक लेलँड यांनी मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये 1 लाख 98 हजार 113 वाहनांची विक्री करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या आधीच्या वर्षांचा विचार केल्यास 2018 मध्ये अशोक लेलँड कंपनीने 1 लाख 96 हजार 579 वाहनांची विक्री केली होती. या विक्रमाला 2023 या वर्षाने मागे टाकले आहे.
देशांतर्गत बाजारामध्ये कंपनीने आपला चांगला जम बसवला असल्याचे यावरून निश्चितच दिसून आले आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही आपली उपस्थिती अधिक मजबूत कंपनीने केली असून आगामी काळातही ती वाढवण्यासाठी कंपनीचा प्रयत्न असणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ग्राहक केंद्रित बाजारावर लक्ष करत त्या ठिकाणी सातत्याने गुंतवणूक करण्यावर कंपनीचा भर असणार आहे.









