बेळगावातील बी.एस. येडियुरप्पा मार्गावर बुधवारी दि. १० रोजी पहाटे अडीचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात डॉ. सौरव सदाशिव कांबळे, वय २५ रा. जमखंडी यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रहदारी पोलिसांच्या कडून समजलेली अधिक माहिती अशी कि, डॉ. सौरव हे आपली कार घेऊन त्यांचे मित्र गिरीश कऱ्यापन्नावर, चेतन धरीगौडर अजून एक व्यक्ती यांच्यासह चौघेजण बेळगावातील एका महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभास आले होते. मंगळवारी रात्री जेवण करून आपल्या राहण्याच्या ठिकाणी येडियुरप्पा मार्गावरून जात असताना चालक सौरव यांना रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्यांनी आपल्या कारची जोरदार धडक ट्रकला दिली. हि धडक इतकी जोरदार होती कि, कार रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. या घटनेत डॉ. सौरव यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले. तर रहदारी पोलिसांच्या कडून अधिक तपास चालू आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









