वृत्तसंस्था/चेन्नई
ईस्ट बंगाल एफसी फुटबॉल संघातील मध्य फळीत खेळणारा फुटबॉलपटू मोबासिर रेहमानला चेन्नईन एफसी फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामातील उर्वरीत सामन्यांकरीता लोनवर करारबद्ध केले आहे.
23 वर्षीय रेहमान हा टाटा फुटबॉल अकादमीचा पदवीधर असून तो जमशेदपूरचा रहिवासी आहे. 2018 साली त्याने जमशेदपूर एफसी संघातून आपले इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत पदार्पण केले होते. सध्या सुरू असलेल्या इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत चेन्नईन एफसी संघ गुणतक्त्यात सातव्या स्थानावर असून त्यांचा सुपर चषक स्पर्धेतील सलामीचा सामना येत्या गुरुवारी पंजाब एफसी संघाबरोबर होणार आहे.









