कसबा बीड वार्ताहर
कोगे तालुका करवीर येथे झालेल्या कुस्ती मैदानामध्ये सिकंदर शेखने अवघ्या काही मिनिटातच झोळी डावावर पट काढत रोशन सिंग वर मात केली व विजय संपादन केला.ही कुस्ती पाहण्यासाठी भागातून कुस्ती शवकनांनी खूप गर्दी केली होती.प्रथम क्रमांकाची व अटीतटीची लढत पाहण्यासाठी आलेल्या कुस्ती शौकिनांची कुतुहलता लागली होती.रोशन सिंग यांनी एकेरी पट काढत सिकंदर शेख वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पण सिकंदर शेख ने दुहेरी पट काढत जोडी डावावर रोशन सिंग या पैलवानास चिटपट केले.
कोगे येथे कै. प्रकाश कुंडलिकराव पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान संपन्न झाले. या मैदानामध्ये प्रमुख 3 कुस्त्या, प्रेक्षणीय व 100 गुण अधिक लहान मोठ्या वजन गटातील चटकदार कुस्त्या झाल्या.या मैदानात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती संग्राम पाटील विरुद्ध भैरू माने या लढतीमध्ये संग्राम पाटील या पैलवानाने 3 ऱ्या मिनिटावर डोळ्याची पापणी लवती न लवती तोच एकेरी पटावर विजय मिळविला. तर तिसरी प्रमुख कुस्तीमध्ये पृथ्वीराज पाटील विरुद्ध भारत मध्ये या कुस्तीमध्ये भारत ने स्पीड मध्ये चाल केली पण संयमी पृथ्वीराज ने एक लंगी डाव घेत चित्याच्या चपळाईने या अटीतटीच्या लढतीत बॅक थ्रो डावावर विजय मिळविला.
यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार चंद्रदीप नरके,गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे,गोकुळचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वासराव पाटील, गोकुळचे संचालक कुंभी बँकेचे चेअरमन व अजित नरके, शशिकांत पाटील, एस.आर पाटील, युवा नेते देवराज नरके, कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन उत्तमराव वरुटे, दादासो लाड, के. डी. कांबळे, राहुल खाडे, माजी संचालक भगवान पाटील व सर्व संचालक, सांगलीचे तहसिलदार अनंत गुरव , आदी प्रशासकीय व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
या मैदानाचे आखाडा पूजन कोगे गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.पंच म्हणून संभाजी पाटील,संभाजी वरुटे, प्रा. रघुनाथ मोरे,सर्जेराव पाटील,विलास पाटील , संग्राम पाटील , तानाजी पाटील ,राजाराम पाटील , दत्ता पाटील आदी होते.अण्णा नाळे,वस्ताद विश्वास हारुगले , सुनील फाटक,सागर चौगुले , भरत चव्हाण व पंकज सुतार यांचे बहुमोल सहकार्य लाभले. निवेदक म्हणून यशवंत पाटील, राजाराम चौगले, कोळी सर व संपूर्ण नियोजन आयोजक कुंभी कासारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वास पाटील व विश्वास पाटील युवा मंच आणि हनुमान चौक मित्रमंडळ कोगे यांनी पाहिले.
या संपूर्ण कुस्ती मैदानाचे आयोजक विश्वास पाटील यांनी गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वास हारुगले यांचा सत्कार कोगे गावाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते केला.तसेच कुस्ती शौकिनानी गोकुळ दूध संघाची गोकुळ केसरी स्पर्धा सुरु नसल्याने अनेक दिवस कुस्ती पैलवानांच्या झोळी डाव, घिसा डाव,एकेरी पट, आकडी डाव , बॅक थ्रो आदी कुस्ती डाव्यांचा डोळे भरून आनंद घेतला व गोकुळने कुस्ती मैदान घ्यावे असे मत व्यक्त केले.